मराठी भाषा संवर्धनासाठी उपक्रम

“ मराठी भाषा संवर्धनासाठी उपक्रम ”
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात अनेक भाषांचा प्रभाव वाढत असताना आपली मातृभाषा मराठी टिकवून ठेवणे आणि तिचा विकास करणे हे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः शाळांमध्ये मराठी भाषेचा वापर वाढवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबवणे आवश्यक आहे. उपक्रमांची आवश्यकता: • मराठी भाषेचा वापर वाढवणे • विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण करणे • मराठी भाषेतील साहित्य आणि संस्कृतीचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे • मराठी भाषेतील कौशल्ये विकसित करणे उपक्रम: • मराठी भाषेचा वापर अनिवार्य करणे: शाळेतील सर्व क्रियाकलापांमध्ये, शिक्षणात, आणि विद्यार्थ्यांमधील संवादात मराठी भाषेचा वापर अनिवार्य करणे. • मराठी भाषा दिवस आणि मराठी महोत्सव आयोजित करणे: दरवर्षी मराठी भाषा दिवस आणि मराठी महोत्सव मोठ्या उत्साहाने आयोजित करणे. यात मराठी भाषेतील विविध स्पर्धा, कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करणे. • मराठी भाषा क्लब स्थापन करणे: मराठी भाषेतील वाचन, लेखन, वादविवाद, नाट्य, आणि इतर कलांचा अभ्यास करण्यासाठी मराठी भाषा क्लब स्थापन करणे. • मराठी पुस्तकांचे वाचन: विद्यार्थ्यांना मराठी पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यासाठी पुस्तकालयात मराठी पुस्तकांचा चांगला संग्रह उपलब्ध करून देणे. • मराठी भाषेतील नाटक आणि चित्रपटांचे आयोजन: विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेतील नाटक आणि चित्रपटांचे आयोजन करणे. • मराठी भाषेतील वक्तृत्व आणि लेखन स्पर्धा: मराठी भाषेतील वक्तृत्व आणि लेखन स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांमधील मराठी भाषेतील कौशल्ये विकसित करणे. • मराठी भाषा शिबिरे: मराठी भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा शिबिरे आयोजित करणे. • अतिथी व्याख्याने: मराठी साहित्यिक, लेखक आणि कवी यांच्याकडून मराठी भाषा आणि साहित्यावर अतिथी व्याख्याने आयोजित करणे. मराठी भाषा टिकवून ठेवणे आणि तिचा विकास करणे हे केवळ शाळेचीच नाही तर समाजाची जबाबदारी आहे. वरील उपक्रमांच्या माध्यमातून आपण मराठी भाषेचा वापर वाढवू शकतो आणि विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण करू शकतो. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये खालील उपक्रम राबविला मराठी हि आपली मातृभाषा बोलीभाषेप्रमाणेच प्रमाणभाषेत शिकणे महत्वाचे आहे. आणि तिचे योग्य रित्या आकलन होण्यासाठी तिच्यातील विविध भाषिक वाचन व लेखन उपक्रम होणे आवश्यक आहे. या दृष्टीने विद्यार्थ्यांमधील लेखन कौशल्य विकसित करून स्वअभिव्यक्तीस चालना देणे हे या कवितालेखन उपक्रमातून शक्य आहे विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्ती अभिव्यक्तीतून कागदावर उतरली कि त्यांच्यातील लेखक व कवी जागृत होईल आपणही कवितालेखन करू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होईल. व लेखनाची आवड आणखीच वाढेल. अशा प्रतिभावान विद्यार्थ्यांच्या कवितांमधून शाळेच्या काव्यसंग्रहाची निर्मिती हस्तलिखित किंवा प्रकाशित व मुद्रित काव्यसंग्रहातून त्यास मूर्त स्वरूप मिळेल. उपक्रमाचे नियोजन व कार्यवाही १.शाळेतील शांत व भाषिक कौशल्ये राबविण्यास पोषक अशा वर्गाची निवड करणे काव्यलेखन करू शकतील अशा वयोगटातील उदा. इयत्ता तिसरी व त्यापुढील वर्गातील मुलांची निवड करणे २.कल्पनाशक्ती व लेखनशैली तपासण्यासाठी एक विषय देऊन भाषिक लेखन कौशल्याचा सर्व घेणे. आवश्यक लेखन कौशल्य कल्पनाशक्ती व लेखन प्रतिभा असणारे विद्यार्थी निवडणे ३.काही निवडक व प्रसिद्ध कवितांची उदाहरणे त्यातील विशेष बाबी व यमक समजावून देणे .गाण्यात मध्ये किंवा शेवटी वारंवार येणारे शब्द लिहावयास सांगणे. ४.यमक दर्शक शब्द म्हणजे काय ते सांगून अशा शब्दांची उदा. सांगून विद्यार्थ्यांना त्यांची यादी करावयास लावणे. ५. यमक दर्शक शब्द नुसार सुरुवातीस सोप्या विषयावरील चार ओळींच्या व नंतर त्यापेक्षा मोठी कविता लिहिण्यासाठी प्रोत्साहित करणे. ६. सुरेख कवितेच्या ओली लिहिणारे विद्यार्थी किंवा गट यांना शाबासकी देणे. ७. निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी काव्यलेखन कार्यशाळा घेणे. यामध्ये शिक्षकाकडे काव्यलेखन कौशल्य नसल्यास आपल्याजवळील प्रथितयश कवींचे मार्गदर्शन घेणे. ८ प्रथितयश कवींच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे काव्यसंमेलमन घेणे. ९.काव्यसंग्रह प्रकाशनासाठी स्वयंसेवी संस्था किंवा कंपनी किंवा दानशूर व्यक्तींची मदत घेणे. उपक्रमासाठी आवश्यक साहित्य - कागद वही पेन विद्यार्थी कविसंमेलन - शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कविता वाचनाची संधी त्यांना मिळावी यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील दहा मान्यवर कवी व साहित्यिक यांच्या उपस्थितीत विद्यार्थी कविसंमेलनात सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर केल्या तसेच निमंत्रित कवींनी कवितालेखनाबाबत मार्गदर्शन केले व आपल्या कविताही सादर केल्या. तसेच विद्यार्थी कवींचा सन्मान केला. सदर विद्यार्थी कविसंमेलनाचे प्रक्षेपण मावळ वार्ता न्यूज चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले. याचा आनंद ग्रामस्थ व पालकांनीही घेतला . काव्यसंग्रह प्रकाशन - विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या निवडक ६० कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशनासाठी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था आणि बजाज अर्पण ग्रुप यांच्या आर्थिक सहकार्यातून "अक्षरफुलं" या काव्यसंग्रहाचे १००० प्रतीत प्रकाशन करण्यात आले. या काव्यसंग्रहाला मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मा. अध्यक्ष विजया वाड तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे सहाय्यक आयुक्त मा. अनिल गुंजाळ साहेब यांचा व बजाज कंपनीचे राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी यांचा शुभेच्छा संदेश प्राप्त झाला. तसेच दुसरा काव्यसंग्रह "अक्षरधारा" हा शिक्षणमंत्री यांच्या हस्ते पुढील वर्षी प्रकाशित करण्यात आला. पुणे जिल्हा परिषद मार्फत प्रकाशन व गौरव : मराठी भाषा दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेने जिल्हास्तरावर आयोजित केलेल्या काव्यवाचन कार्यक्रमात जिल्हा परिषेदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष शिक्षणाधिकारी इतर पदाधिकारी व प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या टाकवे खुर्द शाळेच्या मुलांनी लिहिलेल्या "अक्षरफूल" काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन करण्यात आले. काव्यमार्गदर्शक म्हणून माझा व शाळेतील बालकवींचा सन्मानही करण्यात आला. यावेळी जिल्हा स्तरावर आयोजीत स्वलिखित काव्यवाचन स्पर्धेत शाळेतील हर्षदा गरुड ७ वि (शेतकरी कविता) व सानिका ढमाले (आई ) कविता यांचा जिल्ह्यात पहिल्या तीन मध्ये क्रमांक आला. निष्कर्ष व व फायदे - १. विद्यार्थ्यांमध्ये स्व अभिव्यक्ती निर्माण होते. २. भाषिक कौशल्ये रुजविली जातात . ३. लेखनाची आवड निर्माण होते व आत्मविश्वास वाढतो. ४. विद्यार्थी सुंदर कविता करू लागतात. ५. मुलांची मुलांची प्रतिभा प्रतिभा कागदावर उतरते ६. विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला चालना मिळते ७. शब्द संपदा वाढते व शिक्षण्यातील आनंद द्विगुणित होतो. मराठी भाषा संवर्धन हा एक सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. यासाठी शाळा, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाज यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. वरील उपक्रमांच्या अंमलबजावणीने मराठी भाषेची आवड निर्माण करणे आणि त्याचा वापर वाढवणे शक्य आहे. एकच ध्यास ! महाराष्ट्राच्या शिक्षणाचा विकास !! अंतर्गत मराठी भाषा संवर्धनासाठी उपक्रम वरील उपक्रम राबविल्यासा नक्कीच गुणवत्तापूर्ण भाषिक व शैक्षणिक विकास होईल यात शंकाच नाही. चला तर मग या उपक्रमाबाबत एक पाऊल पुढे टाकुया ..! लेखन -संजय वसंत जगताप, निर्मिती सदस्य, राज्यस्तरीय जीवन शिक्षण मासिक, (एस. सी. ई. आर. टी ) संपर्क -८६६८६५४५४६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या