बडोदा गुजरात मध्ये रंगलेले ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

बडोदा गुजरात मध्ये रंगलेले ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील काव्याकट्ट्यासाठी माझ्या ‘आई मला जगायचय..!’ या कवितेची निवड झाल्याचे पत्र मला प्राप्त झाले आणि साहित्य संमेलन व बडोदा पर्यटन अशा दोन्ही हेतूने मी व माझी पत्नी दोघानीही प्रस्थान करण्याचे ठरविले आणि आम्ही गुजरात राज्यातील बडोद्याकडे कूच केले. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा अभिमानाने जपलेल्या बडोदेनगरीत हे संमेलन बडोदा येथे १६ ते १८ फेब्रुवारी २०१८ दरम्यान झाले. यापूर्वी १९०९ मध्ये सातवे संमेलन, १९२१ मध्ये अकरावे संमेलन आणि १९३४ मध्ये विसावे संमेलन बडोद्यात झाले होते. सेवानिवृत्त आयएएस अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख हे संमेलनाध्यक्ष होते. ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १६, १७ व १८ फेब्रुवारी, २०१८ रोजी संपन्न झाले. संमेलनात चार परिसंवाद, एक कवि संमेलन, मान्यवरांचे कवितावाचन, “कथा, कथाकार, कथानुभव", "प्रतिभावंतांच्या सहवासात", "टॉक शो", बहुभाषिक कवि संमेलन ह्या वैशिष्टयपूर्ण कार्यक्रमांसह मान्यवरांची मुलाखत, मान्यवर लेखकांचे सत्कार, शास्त्रीय गायन, कलावैभव दर्शन कार्यक्रमांचे आयोजन झाले. मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे यांनी आमंत्रित केलेल्या ह्या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष श्रीमंत राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड या होत्या. स्वतंत्र भारतात बडोदे येथे होणारे हे पहिलेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असून या अगोदरची बडोद्यात झालेली तीनही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने ही ब्रिटीशकालीन भारतात १९०९, १९२१ आणि १९३४ या वर्षी झालेली होती. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर, साहित्यसम्राट न. चिं. केळकर व नारायण गोविंद चापेकर हे अनुक्रमे या संमेलनांचे अध्यक्ष होते. १९०९ च्या संमेलनापूर्वी न्यायमूर्ती रानडे यांनी सुरू केलेल्या ह्या ग्रंथकारांच्या संमेलनाचे रूपांतर प्रथमच "अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना "त झालेले होते. त्यामुळे बडोदे ही या संदर्भात महत्त्वपूर्ण ठरलेली नगरी आहे. संमेलनाच्या उद्घाटनासाठी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक राहणार असून मान्यवरांची प्रमुख आणि विशेष उपस्थिती होती. बडोद्यातील महत्त्वाच्या नामवंत लेखकांचा सत्कारही या प्रसंगी करण्यात आला . "मराठी भाषासुंदरी" असा मराठी भाषेचे सर्वांगसुंदर दर्शन घडविणारा सादरीकरणात्मक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. संमेलनातील काव्य कट्टा विशेष गाजला. मला माझी आई मला जगायचय ही संमेलणासाठी निवड झालेली कविता सादर करण्याची संधी मिळाली कवितेला रसिकांची भरपूर दाद मिळाली. तसेच काव्य कट्टा व्यासपीठावर अध्यक्ष राजन लाखे यांनी आमंत्रित करून काव्यासंमेलणाचे सूत्र संचालन ही केले. काव्य सादरीकरनाबद्दल माझा मानचिन्ह पुष्प व प्रमाणपत्र देऊन सन्मान झाला. महाराजा सयाजीराव गायकवाड संस्थानात जाऊन अखिल भारतीय साहित्य संमेलनात सन्मान होणे ही अभिमानाची बाब होती. माझ्या कवितेला मिळालेली ही खूप मोठी दाद होती. संमेलनातील साहित्यिक मेजवानी बरोबर आम्ही गुजराती पदार्थांचीही मेजवानी तीन दिवस जेवताना अनुभवली. पुस्तक प्रदर्शनात महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे प्रदर्शित केलेले ग्रंथ पाहावयास व अल्पदरात खरेदी करावयास मिळाले. महाराष्ट्रातील माझ्या काही मित्रांसाठीही मी ते भेट देण्यासाठी घेतले. आता आम्हाला बडोदा शहर जवळून पहायचे होते. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे शैक्षणिक संकुल तर आम्ही पाहिलेच पर्यन्त त्यांनी शहराचा नियोजन पूर्वक केलेला विकास पाहिला. महाराजा सयाजी विद्यापीठ - भारतातील सर्वात प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक, महाराजा सयाजी विद्यापीठ, पूर्वी वडोदरा कॉलेज म्हणून ओळखले जाणारे, वडोदरा शहरातील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. याची स्थापना १८८१ मध्ये झाली आणि १९४९ मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या सन्मानार्थ त्याचे सध्याचे नाव देण्यात आले. या शैक्षणिक आस्थापनामध्ये कला, विज्ञान, व्यवस्थापन अभ्यास, वैद्यक आणि फार्मसी या विद्याशाखांसह अनेक विद्याशाखा उपलब्ध आहेत. याशिवाय, ते त्याच्या भव्य वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये गोल गुम्बाझपासून प्रेरणा घेतलेला घुमट, भारतीय आणि बायझंटाईन डिझाइन घटकांना एकत्रित करणाऱ्या कमानी आणि इंडो-सारासेनिक शैलीत बांधलेल्या कलाशाखेचा समावेश आहे. बडोद्यातील काही पाहिलेली ठिकाणे - लक्ष्मी विलास पॅलेस - हा गायकवाड घराण्याचा गुजरातमधील सर्वात प्रेक्षणीय राजकालीन राजवाडा आहे. राजघराण्याने राजवाड्याचे इतर भाग त्यांचे प्राथमिक घर म्हणून वापरणे सुरू ठेवल्यामुळे केवळ राजवाड्यातील सार्वजनिक क्षेत्रे पाहुण्यांसाठी खुली आहेत. बकिंघम पॅलेसच्या आकारमानापेक्षा चारपट आकाराचा हा राजवाडा वडोदरामधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे आणि पूर्वेकडील आणि पाश्चात्य अशा दोन्ही प्रकारच्या वास्तुकलेतून प्रेरणा घेतो. भव्य आतील भाग त्याच्या सुव्यवस्थित मोज़ेक, झुंबर आणि कलाकृतींमध्ये दिसणाऱ्या लक्झरीच्या पातळीला प्रतिबिंबित करण्यासाठी डिझाइन केले आहेत, ज्यांचा भारतीय प्रभाव आहे. याव्यतिरिक्त, राजवाड्यात शस्त्रे आणि कला यांचा उत्कृष्ट संग्रह आहे. वडोदरा म्युझियम - 1887 मध्ये, महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी वडोदरा म्युझियम आणि पिक्चर गॅलरीच्या वडोदरा म्युझियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पायाची पायाभरणी केली. हे संग्रहालय एक महत्त्वाचे आणि मनोरंजक ठिकाण आहे आणि वडोदरामधील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे . यात मौल्यवान कलाकृती, प्रसिद्ध इजिप्शियन ममी, बेबी ब्लू व्हेलचा सांगाडा, चित्रे, तिबेटी कला, अगोटा कांस्य आणि इतर वस्तू आहेत जे येथील मुख्य आकर्षण आहेत. या संग्रहालयाला भेट दिल्याने तुम्हाला भूविज्ञान, पुरातत्वशास्त्र आणि वांशिकशास्त्र यासारख्या विविध विषयांतील कलाकृतींचे परीक्षण करण्याची संधी आहे . सयाजी बाग - ज्याला कामती बाग असेही म्हटले जाते, हे पश्चिम भारतातील सर्वात मोठे उद्यान आणि वडोदरामधील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे . हे चित्र-परिपूर्ण उद्यान वडोदराचे महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी बांधले होते आणि आता ते जगातील सर्वात मोठे फुलांचे घड्याळाचे घर आहे. विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांचे घर असलेल्या या विशाल बागेत 98 विविध प्रकारची झाडे असल्याची नोंद आहे. सयाजी गार्डन हे वडोदरा मधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे यात शंका नाही. हे सयाजी बाग प्राणीसंग्रहालय, वडोदरा म्युझियम आणि पिक्चर गॅलरी आणि सरदार पटेल तारांगण यासह अनेक आकर्षणांचे घर आहे. महाराजा फतेह सिंग म्युझियम - हे लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये आढळणारे एक संग्रहालय आहे. राजघराण्यातील मुलांसाठी शाळा म्हणून या संरचनेचे पूर्वीचे जीवन होते, परंतु अखेरीस तिचे नूतनीकरण करण्यात आले जेणेकरून त्याऐवजी संग्रहालय ठेवता येईल. पूर्वी प्रतिष्ठित मराठा कुटुंबाच्या मालकीच्या संग्रहालयात कलाकृती प्रदर्शनात आहेत. संग्रहामध्ये युरोपमधील पुनर्जागरण आणि रोकोको कालखंडातील कलाकृती, तसेच पोर्ट्रेट, संगमरवरी बस्ट आणि राजा रवि वर्मा यांच्या पोर्ट्रेट संग्रहातील तीसहून अधिक मूळ चित्रांचा समावेश आहे. या कलाकृतीचा एक महत्त्वाचा भाग पूर्ण करण्यासाठी महाराज स्वतः जबाबदार होते. नामवंत शास्त्रीय गायकांचा समावेश असलेला शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम, एका नामवंत मराठी लेखकाचा तसेच प्रकाशन क्षेत्राशी संबंधित एका नामवंत प्रकाशक संपादक यांचा प्रथेप्रमाणे सत्कार, "महाराजा सयाजीराव गायकवाडांचे नवभारताच्या निर्मितीत योगदान", "मराठी संतकवयित्रींची बंडखोरी आणि स्त्रीवाद", "अनुवाद: गरज, समस्या आणि उपाय", आणि "राजकीय वास्तवाच्या समर्थ चित्रणापासून लेखक दूर का ?" अशा विषयांवरील चार परिसंवाद, एक, "नागर ते नांगर" या विषयावरील टॉक शो, "कथा, कथाकार, कथानुभव" या शीर्षकाने कथाकारांचे कथाभाष्य, स्थानिकांचे बहुभाषिक कवि संमेलन, प्रख्यात मान्यवर विचारवंतांची मुलाखत, "प्रतिभावंताच्या सहवासात" हा तीन महत्त्वपूर्ण प्रतिभावंतांच्या गप्पा/बातचितीचा कार्यक्रम, "बोलीतील कविता" या शीर्षकाचा व-हाडी, अहिराणी, झाडीबोली, आगरी, लमाणी, मिश्र बोली या बोलींमधील कवींच्या कवितावाचनाचा कार्यक्रम याशिवाय मराठीतील निवडक नामवंत कवींचे कवितावाचन असे या संमेलनातील कार्यक्रमांचे स्वरूप होते. याशिवाय "श्रीनिवास खळे गीत-संगीत रजनी" आणि "बडोदे कलावैभव" असे दोन महत्त्वपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमही या संमेलनाचा भाग म्हणून आयोजित केले .संमेलनस्थळी ग्रंथ प्रदर्शनही आयोजित करण्यात आले. बृहन् महाराष्ट्रातील विद्यार्थी घरात मराठी बोलत असले तरी घराबाहेर त्या प्रदेशाची भाषा किंवा इंग्रजी, हिंदीत बोलतात. त्यामुळे त्यांचे मातृभाषेशी नाते तुटण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आवश्यक असल्याचे गुजरातमधील मराठी शाळांमधील शैक्षणिक अधिकारी, विश्वस्त सांगत आहेत. त्यामुळेच संमेलनातील परिसंवादाचे विषय जरी विद्यार्थ्यांच्या आकलनापलिकडचे असले तरी त्यांची मराठी साहित्यविश्व आणि साहित्यिक यांच्याशी ओळख व्हावी म्हणून त्यांनी संमेलनामध्ये एक दिवस भेट दिली . ६० मराठी शाळा सुरतमध्ये महापालिकेच्या पहिली ते आठवीच्या एकूण ५६ मराठी शाळा आहेत. तर, नववी आणि दहावीच्या चार शाळा आहेत. या शाळांमध्ये १२०० शिक्षक असून ते मराठी आहेत. या शिक्षकांनाही साहित्य संमेलनामुळे फायदा झाला . सुरतसारख्या शहरात मराठी वस्ती भरपूर असताना विद्यार्थी मात्र मराठी शाळेमध्ये जात नाहीत. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या मराठी नागरिकांना मराठी भाषेसंदर्भात आणि मराठी शाळांसदर्भात पुन्हा गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल. गुजरातमध्ये आठ दशकांनंतर मराठी साहित्य संमेलन होत असल्याने मराठीपासून तुटू शकणाऱ्या मुलांच्या दृष्टिकोनातून हे संमेलन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. वापीमधील इतर मराठी शाळांशीही त्यांनी संपर्क साधला असून या विद्यार्थ्यांची एकदिवसीय सहल संमेलनस्थळी नेण्यात आले . या संमेलनात लहान मुलांसाठीही खास साहित्यिक कार्यक्रम बालकट्ट्यावर झाले . या कार्यक्रमासाठी इंग्रजी माध्यमातील मराठी मुलांनाही येण्याचे आवाहन करण्यात आले . मराठी विद्यार्थी असूनही त्यांना अपेक्षित मराठी साहित्याचा प्रसार झालेला नाही. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शालेय अभ्यासक्रमातील साहित्य ज्या पुस्तकांमधून घेण्यात आले आहे, त्या पुस्तकांशी विद्यार्थ्यांची ओळख होईल, तसेच ते साहित्यिक पाहता येतील आणि त्यामुळे मराठी वाचनाचा प्रसार होईल, अशी अपेक्षा आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना बडोदा साहित्य संमेलनात नेण्यात येणार आल्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त इतर साहित्याची ओळख मुलांना झाली. कविता, कथा, कादंबरी, वैचारिक लेखन, समीक्षा अशा विविध साहित्यप्रकाराची ओळख व्हावी हा याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. बडोदा एक संस्कार, शिक्षण आणि सर्व दृष्टीने पुढे राहिलेली नगरी आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन ऐतिहासिक संमेलन बनले . त्याला सर्वांचे सहकार्य आणि मदत मिळाले , अशी मनोगत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड केले . महाराष्ट्र शासनाने सयाजीराव गायकवाड यांच्यावर तयार केलेल्या खंडाचे प्रकाशन संमेलनात करण्यात आले . महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे शुभांगिनीराजे गायकवाड यांचा सत्कार डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे बडोदा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष शुभांगिनीराजे गायकवाड यांचा सत्कार डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. महाराजांवर संशोधन करून चरित्र तयार केले गेले. त्यातील खंडाचे प्रकाशन या संमेलनात झाले. त्याद्वारे सयाजीराव महाराजांचे स्वातंत्र्यपूर्व काळातील कार्य लोकांसमोर येईल. महाराष्ट्राच्या शैक्षणिक चळवळीत महाराजांचे मोठे योगदान आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांनी समाजपरिवर्तन, शिक्षण, कला याची सांगड घातली, असे सांगून डॉ. पी. डी. पाटील यांनी बडोदा येथे होणाऱ्या या संमेलनाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देत असल्याचे जाहीर केले. बडोदा येथे संपन्न झालेले हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरले व या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आम्हाला उभयतांना होता आले हे आमचे भाग्य आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते मला माझ्या कवितेने स्वप्ना पलीकडे जाऊन बरेच काही दिले आहे. -डॉ संजय वसंत जगताप काव्यकट्टासाठी निवड 8669654546 अखिल भारतीय मराठी सा. संमेलन बडोदा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या