दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा 

 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 

                    दिल्ली राजधानी दिल्लीत माय मराठीचा जयघोष संसद भवन मार्गावर दिमाखदार ग्रंथदिंडी, टाळ-मृदुंगाचा गजर, ढोल-ताशांचा निनाद, मराठीचा जागर, महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा जपणाऱ्या लोककलाकारांच्या सादरीकरणाने राजधानी दिल्ली दुमदुमली ती ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने. संसद भवन ते साहित्य भवन मार्गावर ग्रंथदिंडीचा दिमाखदार सोहळा तालकटोरा स्टेडियमवर पोहोचताच सर्वांच्या आनंदाला उधान आले. प्रमुख पाहुणे अतिथी सांस्कृतिक संच यासोबत आम्हीही ग्रंथ दिंडीत सक्रिय सहभागी झालो.
            काव्य कट्टा मध्ये माझ्या कवितेची निवड झाली आणि हा अविस्मरणीय सोहळा पाहण्याची संधी आम्हाला उभयतांना प्राप्त झाली. प्रकाशन कट्ट्यावर माझ्या सहावे पुस्तक ‘ लेखावली- प्रवास एका लेखणीचा’ याचे प्रकाशन होणार असल्याने ही मोठी संधीच चालून आली होती. त्यावेळी तीन दिवस अनुभवलेला हा मराठी नयनरम्य सोहळा व त्याचे वर्णन करण्यासाठी हा लेखन प्रपंच साकारत आहे . ग्रंथ दिंडीचे स्वागत छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नावाने असलेले ग्रंथनगरीचे प्रवेशद्वार सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडप येथे संमेलनाचे ध्वजारोहण निमंत्रक संजय नहार, नियोजित अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, राजन लाखे, सुनीताराजे पवार, अॅड. प्रमोद आडकर, विनोद कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. फुगडीचा फेर, बहारदार लेझीम दिंडीपुढे डोक्यावर तुळस घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी मराठी संस्कृतीची ओळख दर्शविताना फुगडीचा फेर धरला, तर कल्याणच्या लेझीम पथकाने बहारदार लेझीम सादर केले. युवक-युवतींनी आदिवासी नृत्य केले. 

             

                राजधानी दिल्लीतील विज्ञान नवनात अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या सरहद पुणे आयोजित ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. भाषा हे फक्त संवादाचे माध्यम नसते. तर ती संस्कृतीचेही संवाहक असते. समाजाच्या जडणघडीत तिचे नोठे योगदान असते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, सरहदचे संस्थापक संजय नहार, साहित्य महामंडळाच्या सचिव उज्ज्वला मेहंदळे आणि कोषाध्यक्ष प्रकाश पागे व्यासपीठावर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने मोदी यांनी मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. सुरुवातीला पंतप्रधान मोदी चांना विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. आज जागतिक मातृभाषा दिन आहे. दिल्लीत आयोजित मराठी साहित्य संमेलनाच्या उ‌द्घाटनासाठी तुम्ही हा दिवस निवडला. याबद्दल आयोजकांना धन्यवाद देत मोदी म्हणाले की, मराठी भाषेवर माझे प्रेम आहे. त्यामुळे मी मराठीत बोलण्याचा आणि मराठी भाषेतील नवीन शब्द शिकण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतो. 


        आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात मोदी यांनी मराठी भाषेतील अनेक संत, कवी, ऋषिमुनी, साहित्यिक आणि स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, असे स्वप्न जगभरातील मराठी माणसांनी पाहिले होते, पंतप्रधान मोदी यांनी मराठी माणसांच्या या स्वप्नांची पूर्तता केली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटले. शासकीय कारभारातून अरबी आणि फारसी शब्द दूर करीत राजकारभारात मराठी भाषेचा वापर करण्याचा आग्रह आणि सक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली होती. मराठी ही समृध्द भाषा आहे. लोकभाषा आहे. ज्यांना माया आणि वात्सल्य समजते, ते दुस-याच्या भाषेचा दुस्वास करू शकत नाही, असे फडणवीस म्हणाले. अनेक गाजलेल्या मराठी सुभाषितांचा भाषणात त्यांनी अचूक उल्लेख करीत उपस्थितांना आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का दिला. मोदी ज्यावेळी मराठी भाषेत काही वाक्य बोलायचे, त्यावेळी सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडाकडाट व्हायचा. मराठीचा जन्म संस्कृत भाषेतून झाला. आपली भाषा ही आपल्या आईसारखी असते. आई जशी मुलांवर लक्ष ठेवते, तशी भाषाही आपल्यावर लक्ष ठेवत असते, असे मोदी म्हणाले. ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे शुक्रवारी राजधानी दिल्लीत दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्यिक रवींद्र शोभणे, ज्येष्ठ नेते शरद पवार, सम्मेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर, उषा तांबे आणि संजय नहार प्रामुख्याने उपस्थित होते. संमेलन दिल्लीत होणे अभिमानास्पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिपादन केले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे संमेलन दिल्लीत होणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. स्वभाषेचा अभिमान आणि आग्रह छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच आपण शिकलो आहोत, असाही मुद्दा फडणवीस यांनी मांडला. संमेलन होत असलेल्या तालकटोरा स्टेडिअममध्ये १७३७मध्ये मराठ्यांनी आपली छावणी लावून दिल्ली जिंकली होती. आता आमचा मराठी माणूस आपल्या विचारांनी दिल्ली जिंकणार आहे. संतांनी मराठी भाषा अधिक समृद्ध केली. कला, साहित्य, संस्कृती मराठी माणसाच्या ठायी वसलेली आहे. त्यामुळेच वेगवेगळी साहित्य संमेलने महाराष्ट्रात होत असतात, त्यात बोली भाषांना स्थान मिळत असते. दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठीची सेवा करण्याची संधी सर्वांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. हे संमेलन ऐतिहासिक ठरणार, पुढे १००वे संमेलनही भव्य स्वरुपात साजरे करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले. 


            

 'भाषा ही जोडणारी असावी, तोडणारी नाही. दिल्लीतील या साहित्य संमेलनाची अध्यक्ष एक स्त्री झाली, हा मुद्दाच नाही, तर गुणवत्ता हा महत्त्वाचा मुद्दा आहे,' असे ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात शुक्रवारी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थित हजारो मराठीजनांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाट केला. 'विज्ञान भवनात रंगलेल्या या कार्यक्रमात डॉ. भवाळकर यांनी, 'शंभर उणे दोन'वे संमेलन ही लोकभाषा व ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही अभिजात भाषा,' असे सांगत भाषणाला सुरुवात केली आणि त्यांच्या त्या उत्स्फूर्त संवादाला वारंवार दाद मिळत गेली. दिल्लीत सात दशकांपूर्वी झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. 'आज फार काही बोलायचे नाही, असा मला दम भरला आहे,' असे सांगून तारा भवाळकर यांच्या लिखित अध्यक्षीय भाषणात, 'जन्म जैविक नाही,' या आशयाच्या विधानावर टीका केल्याचे दिसते. 'आजही एखादा म्हणतो, की माझा जन्म जैविक नाही, त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा हा भाग वेगळा; परंतु त्याचा भांडाफोड आमच्या संत कवयित्रींनी तेराव्या-चौदाव्या शतकात केलेला आहे, असे भवाळकर यांच्या भाषणात म्हटले आहे. डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, की 'पंतप्रधानांना विठ्ठल-रखुमाईची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. विठ्ठल-रखुमाई हे आमच्या महाराष्ट्राच्या उदार संस्कृतीचे प्रतीक आहेत. भाषा ही जैविक असते, प्रवाही असते. बोलली गेली, तर ती जिवंत राहते व महाराष्ट्रात संतांनी ही मराठी जिवंतच ठेवली नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांसाठीही त्यांनी भूमी निर्माण केली. ज्या दिवशी आईने बाळासाठी पहिली ओवी म्हटली, त्या दिवशी मराठी निर्माण झाली.' भवाळकर यांच्या भाषणानंतर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. भाषण संपवून त्या परत आल्या, तेव्हा पंतप्रधानांनी त्यांना फार छान, अशी मराठीतून दाद दिली. यावर भवाळकर यांनी त्यांना गुजरातीमध्ये उत्तर दिले. 'मने भी गुजराती आवडे छे,' असे त्या म्हणाल्या. पंतप्रधानांनी हा छोटासा प्रसंग सांगितला, तेव्हाही विज्ञान भवनात पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. 




             ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये दुसऱ्या दिवशी, शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, तालकटोरा स्टेडियममधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपामध्ये निमंत्रित कवींनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. निमंत्रित ४२ कवींनी शेतकऱ्यांच्या व्यथा, आई-बाप, स्त्री सशक्तीकरण यासह विविध विषयांवरील कविता मांडल्या. या कवी संमेलनाचे अध्यक्ष इंद्रजित भालेराव यांनी त्यांची शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी 'दार उघड दिल्ली दार उघड' ही कविता मांडून शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न राजधानीत मांडला. कवी संमेलनाची सुरुवात रसिका देशमुख यांच्या विठुरायावरील कवितेने झाली. त्यानंतर 'एकविसावं शतक आलं तरी कुणब्याची तीच गत, कवा होईल ज्ञानबराव आपली परगती,' अशा शब्दांत कवी महेश मोरे यांनी व्यथा मांडली. प्रशांत झिलपे यांनी त्यांच्या कवितेच्या ओळीतून राजकीय सद्यस्थितीवर फटकेबाजी केली. कवी शैलजा कारंडे यांनी शेतकऱ्यांच्या मुलींवरील कविता मांडली. मी माझी ‘ आई विश्व ची सारा’ ही कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. कवी इंद्रजित भालेराव यांनी मांडली बळीराजाची व्यथा मांडली. 'तोडो दिल्ली के कांगोरे' म्हणत चारशे वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी पंजाबच्या लोकांनी दिल्लीवर आक्रमण केले होते. तेव्हा औरंगजेबाने शेतसारा माफ केला. आजही पंजाबचा शेतकरी दिल्लीवर आक्रमण करतो आहे; पण दिल्लीच्या सीमा आणखी कठोर झाल्या आहेत. दिल्लीचे खंदक अधिक जीवघेणे झाले आहेत, असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणाच्या शेवटी अध्यक्ष इंद्रजित भालेराव यांनी 'दार उघड दिल्ली दार उघड, बळी आला दारी, आता दार उघड' ही कविता मांडून बळीराजाची व्यथा त्यांच्या शब्दांतून मांडली. कवी नीलम माणगावे यांनी साहित्य आणि शब्दांवर कविता मांडली. मंदा नांदुरकर यांनी आदिवासींच्या बोलीतील कविता मांडली; तर 'बाप कुणाला कळला नाही' ही कविता कवी राजेंद्र सोमवंशी यांनी मांडली. आईने ओवी लिहिली 'त्या' दिवशी मराठी भाषेचा जन्म झाला असे डॉ. तारा भवाळकर मत व्यक्त केले. 



             मराठी भाषा ही संतांनी टिकवली आहे. कोणी पुरोगामी म्हणो वा फुरोगामी; मात्र आमचे संत खऱ्या अथनि पुरोगामी होते. असा उल्लेख करीत संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या की, मराठी भाषा ही त्या अर्थान जैविक आहे. ज्या दिवशी आईने आपल्या बाळासाठी ओवी लिहिली. 'त्या' दिवशी मराठी भाषेचा जन्म झाला. भाषा हे संस्कृतीचे बलस्थान आहे. भाषा ही जोडणारी गोष्ट असली पाहिजे, तोडणारी नाही, असे त्या म्हणाल्या. स्वागताध्यक्ष शरद पवार यांनीही आपल्या भाषणात मराठी भाषेच्या समाजजीवनातील वाटचालीचा आढावा घेतला. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी स्वागतपर भाषण केले. संमेलनाचे आमंत्रक संजय नहार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मुद्यावरून समाजात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, पण भारतीय भाषांमध्ये गैर असे काही नाही. उलट साहित्याची देशाच्या वाटचालीत मोठी भूमिका आहे. विंदा करंदीकरांच्या कविता तर अनेक भाषांमध्ये आल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक संतांनी मराठी भाषेत साहित्य रचत समाजाला नवी दिशा आणि प्रेरणा दिली, याचा १०० वर्षांपूर्वी एक व्यक्तीने स्थापन केलेल्या रा. स्व संघरुपी रोपट्याचा आज वटवृत झाला आहे. यावर्षी त्य संघटनेची शताब्दी आहे, पाच गौरवपूर्ण उल्लेख करीत मोट म्हणाले की, शंभर वर्षांपासून संब देशाची संस्कृती आणि परपंच जपण्याचा प्रयत्न करीत आहे. रा स्व. संघामुळेच मला मराठी भाष आणि मराठी संस्कृतीश जुळण्याचे भाग्य लाभले. उल्लेख करीत मोदी म्हणाले गदिमा आणि सुधीर फडके यांच गीतरामायणाने आपल्या जीवनान मोठा प्रभाव टाकला. ज्ञानेश्व आणि गीतारहस्य यांचाही त्यां उल्लेख केला. स्वातंत्र्य आंदोलन लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर या मोठे योगदान होते. जोतिबा फुले सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहे आंबेडकर यांच्यासारख्या मरा समाजसुधारकांचेही मोठे योगदान आहे. आयुर्वेद आ तर्कशास्त्रातही मराठी तोका अनन्यसाधारण असे योगदान आ मुंबई फक्त महाराष्ट्राची नाही. देशाची आर्थिक राजधानी म्हण पुढे आली आहे, असे ते म्हणाले. मराठी भाषेत शुरता, वीरता आहे. सौंदर्य आहे. संवेद आहे, समानता आहे, समरस आहे, अध्यात्म आहे, आधुनिक आहे, भक्ती, शक्ती आहे आ युक्तीही आहे, याकडे मोदीनी लक्ष वेधले.


             माणूस जेव्हा केव्हा जन्माला आला असेल विश्वामध्ये तेव्हापासून तो आपल्या भोवतालच्या वातावरणातून बऱ्याच गोष्टी शिकत आला आहे. चालीरीती, रुबी या तिथल्या निसर्गान त्याला शिकवल्या आणि त्याच्या गरजांनी, हवामानाने शिकवल्या, त्याच्या भावना, श्रद्धा, आचरण, त्याची घरे, त्याचं बोलणं, त्याच्या देवता, त्याचं अन्न हे सारं तो जिथे होता तिथल्या निसर्गान घडवून आणलं आणि याला आपण म्हणतो ही संस्कृती. मानववंश जन्माला आल्यापासून आजपर्यंत जी स्थित्यंतरे झाली ती निसर्गाने आणि भोवतालच्या वातावरणाने झाली. नंतरच्या काळामध्ये निरनिराळ्या संस्कृतींच्या लोकांच्या सरमिसळीमुळे, देवाण-घेवाणीमुळे झाली.. हे मानववंशशास्त्र. माणसाच्या वंशाने हे सगळं निर्माण केलं, काही स्वीकारलं. काही गोष्टी नाकारल्याही. काळाच्या ओघामध्ये काही गोष्टी अनावश्यक वाटायला लागतात, काही गोष्टीत सुधारणा करावीशी वाटते. काही गोष्टी एकदम सोडून द्याव्या वाटतात, काही थोडंसं परिवर्तन करून मग त्या वापराव्याशा वाटतात... हा सगळा माणसाचा इतिहास। मानववंश, समाजशास्त्र, त्याच्या पाठीमागचं माणसाचं मन, त्याच्या श्रद्धा, देवदेवता, भावभावना, संवेदनांच्या देवाणघेवाणीतून माणूस घडला. त्याला आपण संस्कृती म्हणतो. निसर्गाने माणसाला मूलतः जगायला शिकवले आहे आणि तो प्रवास आजपर्यंत चाललेला आहे म्हणून याला लोकसंस्कृती म्हणायचं आणि या धर्माला मी 'लोकधर्म' असे म्हणते. तुम्ही कुठलाही शिक्का मारा. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन वगैरे काहीही मारा; परंतु लोकांच्या जगण्यातून जे आपोआप निर्माण झालेलं आहे, तो 'लोकधर्म', म्हणून रूढार्थाने इथला धर्म जरी बदलला आणि भौगोलिक परिस्थिती तीच असली तरी चालीरीती, रूढीमध्ये फारसा फरक पडत नाही आणि म्हणून धर्मांतर करूनसुद्धा संस्कृत्यंतर होतंच असं नाही. लोकसंस्कृती ही सबंध भारताच्या सांस्कृतिक, धार्मिक जीवनाला व्यापून राहिलेली आहे. प्राचीन काळापासून चालत आलेला सर्वसामान्य माणसांच्या आचारातला, विचारातला, भावनांतला, संवेदनातला जो आचार धर्म; त्याला मी 'लोकधर्म' असंच म्हणते. त्यामुळे आपला धर्म हा अमुक आहे तमुक आहे अशा एकारलेपणामध्ये कधी मला अडकावंसं वाटलं नाही. फार सुदैवाने आपलं सगळे संत साहित्य, विशेषतः वारकरी मराठी संत साहित्य प्रामुख्याने अतिशय उदारमनस्क साहित्य आहे. ज्याला आपण प्रबोधन प्रबोधन म्हणतो ते लोकपरंपरेतल्या स्त्रियांनी, संतांनी, पुरुषांनी, लोककलावंतांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. लोकसंस्कृतीचा हा व्याप आपल्या सगळ्या आधुनिक संस्कृतीलासुद्धा व्यापून राहिलेला आहे. जी बाई कुठल्याही शाळा, कॉलेजात गेली नाही, कुठल्याही स्त्रीमुक्तीवालीकडे गेली नाही, तिला कुठली सिमोन दि बोव्हा माहिती नव्हती. ती काय म्हणते? "देहाचा विटाळ, देहीचं जन्मला, शुद्ध तो जाहला कवण प्राणी ॥ उत्पत्तीचे मूळ विटाळाचे स्थानं। कोण देह निर्माण नाही जगी।" असा मला एखादा माणूस दाखवून द्या की जो विटाळाच्या स्थानातून जन्माला आला नाही. 



            आता आजही एखादा म्हणतो की माझा जन्म जैविक नाही वगैरे.. त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा हा भाग वेगळा, परंतु त्याचा भंडाफोड या आमच्या संत, कवयित्रींनी तेराव्या चौदाव्या शतकामध्ये केलेला आहे. आज माणसांचं जीवन कसं चाललेलं दिसतं ? जुनं ते जाऊद्या सगळं, आता नवीन काय ते पाहा.. असं एकीकडे म्हणायचं आणि एकीकडे जुन्याचाच पुन्हा पुन्हा वापर कसा योग्य आहे हे सांगण्याचाही प्रयत्न करायचा. त्यासाठी लोकांना निरनिराळ्या कर्मकांडात गुंतवून ठेवण्याचे उद्योग, देवाधर्माच्या नावावर, संस्कृतीच्या नावावर पुन्हा पुन्हा चाललेले दिसतात. त्यांचे हे भाषण सर्वांना भावणारे ठरले संमेलनात आणि माध्यमात या भाषणाची खूप चर्चा झाली एकंदरीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषिकांसाठी एक ऐतिहासिक व अविस्मरणीय आठवण देणारे ठरले आमचे भाग्य असे की आम्हाला यात सहभागी होता आले आणि सोनेरी क्षणांचे साक्षीदार होता आले.इतिहासापासून आज तागायत दिल्लीच्या तख्तावर महाराष्ट्राचा व मराठी मुलूखाचा प्रभाव व अंकुश राहिला आहे. तो यापुढेही राहील यात शंकाच नाही म्हणूनच राज्य गीतातील हे वाक्य पुन्हा पुन्हा उच्चारावेसे वाटते , “दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा..!” 

                                                                       -: संजय वसंत जगताप 
 सहभागी सदस्य - दिल्ली साहित्य संमेलन 
 मो. ८६६८६५४५४६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या