गीत : *केतकी निमगावच्या शंभू महादेवा*
केतकी निमगावच्या शंभू महादेवा
आलो यात्रेला करण्या तुझी सेवा ||ध्रु||
शिव भक्तांची जमली इथ गर्दी
भस्म लावूनी अंगा शंभूभक्त दर्दी
*कावडी मिरवून वाटती गुळमेवा*
आलो यात्रेला करण्या तुझी सेवा ||१||
नाद डमरूचा घुमतो आमच्या कानी
भजन कीर्तन रंगे महादेवाची गाणी
*केतकेश्वराचा आशीर्वाद मनी ठेवा*
आलो यात्रेला करण्या तुझी सेवा ||२||
भोळ्या शंकरा आवडे हे बेल पान
वाहतो पिंडीवर अभिषेकाचा मान
*रथ ओढूनि भक्तीचा आनंद घ्यावा*
आलो यात्रेला करण्या तुझी सेवा ||३||
हर हर महादेव दुमदुमे आसमंत सारा
कुस्ती आखाड्यात जोशात घुमे नारा
*या मातीचा सुगंध उरात भरुनी न्यावा*
आलो यात्रेला करण्या तुझी सेवा ||४||
केतकी निमगावच्या शंभू महादेवा
आलो यात्रेला करण्या तुझी सेवा ||ध्रु||
-: *संजय वसंत जगताप*
साहित्यिक, निमगाव केतकी ८६६८६५४५४६
www.shikshansanjeevani.com

0 टिप्पण्या